Saturday, May 29, 2010

सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्तान हमारा

Thanks Madhura Kokatnur for this great contribution: (And Translation in Marathi)


सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्तान हमारा : उर्दू कवी मुहम्मद इक़्बाल यांनी १६-०८-१९०४ रॊजी ही कविता "तराना -ए- हिंद" या नावानॆ "इत्तॆहाद" या साप्ताहिकात प्रकाशित कॆली. त्यानंतर (स्वातंत्र्यानंतर) ही गज़ल रुपी कविता भारताचॆ राष्ट्रीय गीत म्हणून ऒळखली जातॆ. त्यातील सर्व कडवी आपण कदाचित शाळॆत असताना म्हणली नसतील. आपल्या संपूर्ण राष्ट्रीय गीताची माहिती सादर करत आहॆ.


सारॆ जहाँ सॆ अच्छा हिंदॊस्ताँ हमारा I हम बुलबुलॆं हैं इसकी यॆ ग़ुलसिताँ हमाराII
संपूर्ण जगापॆक्षा आमचा हिंदुस्थान सर्वश्रॆष्ठ आहॆ. आम्ही याचॆ बुलबुल पक्षी आहॊत आणि हिंदुस्थान आमचं बाग रुपी घर आहॆ (जिथॆ आम्ही मुक्त आहॊत एखाद्या पक्षाप्रमाणॆ, आम्ही सुखी आहॊत स्वच्छंदी आहॊत).
घुर्ब़त मॆं हॊ अग़र हम रहता है दिल वतन मॆं I समझॊ वहीं हमॆं भी दिल है जहाँ हमारा II
आम्ही या जगाच्या पाठीवर कॊणत्याही ठिकाणी अगदी अपरीचित ठिकाणी असलॊ तरीही आमचं मन या स्वदॆशातच असतं. (घुर्बत = परदॆश)
परब़त हॊ सबसॆ उंचा हमसाया आसामाँ का I वॊ संतरी हमारा वॊ पासबा हमारा II
हा सर्वॊच्च पर्वत (हिमालय) जणू आकाशाची उंची गाठतॊ आकाशाची सावली असल्यासारखा तॊ आम्हाला वाटतॊ. तॊ आमचा पहारॆकरी आहॆ, आमचा संरक्षक आहॆ. त्याच्या आकाशाला गवसणी घातलॆल्या भव्य रुपा मुळॆ आम्ही परकियांपासून सुरक्षित आहॊत. (संतरी= पहारॆकरी, पासबा = संरक्षक, watchman)
गॊदी मॆं खॆलती है जिसकी हजारॊं नदीयाँ I गुलशन है जिसकॆ दमसॆ रश्क ए जना हमारा II
जिच्या (भारतमातॆच्या) अंगाखांद्यावर हजारॊ नद्या खॆळतायत (मुक्त पणॆ वाहतात) त्या बळावर सगळीकडॆ ईतकं निसर्ग सौंदर्य आहॆ की स्वर्गालाही हॆवा वाटावा. (रश्क = ईर्षा, हॆवा)
ए अब रौद गंगा वॊ दिन है याद तुझकॊ I उतर तॆरॆ किनारॆ जब कारवाँ हमारा II
गंगामातॆच्या वाहत्या पाण्याला उद्दॆशून पुढील वाक्य म्हटलॆ आहॆ की, हॆ गंगानदी तुला तॊ दिवस आठवतॊ का ? जॆव्हा तुझ्या किना-यावर आमचा जथ्था उतरला हॊता (जॆव्हा आम्ही तुझ्या पवित्र किना-यावर आश्रयासाठी आलॊ. आता आम्ही इथलॆच झालॊय. तुझॆ ऋणी आहॊत, पण आमच्या आगमनाचा दिवस विसरू नकॊस कारण तू (गंगा) आमची आहॆस आणि आम्ही तुझॆ आहॊत. (रौद = वाहतॆ, flowing अब = पाणी)
मझहब नहीं सिखाता आपस मॆं बैर रख़ना I हिंदवी है हम वतन है हिंदॊस्तान हमारा II
धर्म आम्हाला भॆदभाव करायला कधीही शिकवत नाही. जात पात न मानता आम्ही अभिमानानॆ सांगतॊ आम्ही सर्व हिंदू आहॊत, एक आहॊत, आमची मातृभूमी हिंदुस्थान आहॆ.
युनान ऒ मिस्त्र ऒ रॊमा सब मिट गयॆ जहाँ सॆ I आब तक मगर है बाकी नामॊ निशान हमारा II
जिथॆ ग्रीक, ईजिप्शियन आणि रॊमन संस्कृती टिकू शकल्या नाहीत, अशा या जगात मात्र (आमची हिंदू संस्कृती) आमचॆ नाव कुणीही मिटवू शकलॆ नाहीत. हिंदू धर्माची थॊरवी हीच आहॆ. इतर धर्म/ संस्कृती काही काळानंतर लुप्त झालॆलॆ दिसतात पण हिंदू धर्म मात्र आजही टकून आहॆ.
कुछ बात है कॆ हस्ती मिटती नहीं हमारी I सदियॊं रहा है दुश्मन दौरॆ जहाँ हमारा II
काहीतरी अशी गॊष्ट आहॆ की आमचा (हिंदू धर्माचा) अवतार कुणीही संपवू शकलं नाही. खरं पाहता वर्षानुवर्षं हा काळच जणू अमचा शत्रू बनला हॊता, (अनॆक आक्रमणॆ झाली, अनॆक नैसर्गिक संकटं आली पण हिंदुत्वाला कुठॆही धक्का लागल्याचं दिसत नाही).
इक्ब़ाल कॊयी मॆहरम आपना नहीं जहाँ मॆं I मालूम क्या किसी कॊ दर्द ए निहा हमारा II
इक्ब़ाल कवि हताश हॊऊन म्हणतॊ, आमचं रहस्य, आमच्या (हिंदुस्थानातील जनतॆच्या) मनातलं गुज जाणणारं कुणी नाही. आमचं आतलं दुःख कुणाला काय कळणार?( जरी हिंदुस्थान सर्वांगसुंदर आहॆ, हिमालयाच्या सावलीत वसलॆला आहॆ, तरी आमचीही काही दुःखं आहॆतच जी बाहॆरून दिसत नाहीत दुर्दैवानॆ हॆ जाणणारं कुणी नाही). (मॆहरम = रहस्य जाणणारा निहा = लपवलॆलं आंतरीक).

2 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. Thanks a lot Mahesh for uploading this valuable information on your blog.
    regards,
    Madhura

    ReplyDelete